Thursday, March 26, 2026

Latest Posts

गणपती बाप्पा आणि सायबर क्राईम – आधुनिक युगातील बोध

रत्नागिरी: गणेशोत्सव हा बुद्धीचे, विवेकाचे आणि सजगतेचे प्रतीक असलेला उत्सव आहे. गणपती बाप्पा “विद्या, बुद्धी आणि प्रज्ञा” देणारे म्हणून ओळखले जातात. आजच्या डिजिटल युगात आपण तंत्रज्ञानाने पुढे जात आहोत, पण त्याचबरोबर सायबर क्राईमचे धोके वाढत आहेत. त्यामुळे गणपती बाप्पांकडून आपण फक्त मोदक आणि मंगलमय वातावरणच नाही, तर डिजिटल सुरक्षेचा बोध घेणेही आवश्यक आहे.

जसे गणपती बाप्पा “विघ्नहर्ता” आहेत, तसेच सायबर क्राईमचे विघ्न दूर करण्यासाठी आपणच जागरूक व्हायला हवे.

*मूषक वाहनाचा संदेश :* मूषक म्हणजे लहानसा पण वेगवान प्राणी. परंतु त्याला कसे वागावे हे सांगण्यासाठी गणपती बाप्पा, तसाच मोबाईल अगदी लहानसाच आणि चपळ सुद्धा परंतु त्याने कसे वागायचे हे सांगण्यासाठी आपण योग्य वापरला तर मित्र, पण चुकीच्या वापरामुळे तो फसवणुकीचे साधन होतो.

*मोदकाचा बोध :* जसा मोदक आतून गोड असतो, परंतु मोदक अति सेवन केला तर त्याचा आरोग्याला अपाय होऊच शकतो तसेच सोशल मीडियावरील आकर्षक ऑफर्स दिसायला गोड, परंतु त्या किती खऱ्या हे तपासणे आपली जबाबदारी.
*मोठे कान :* बाप्पांचे कान मोठे आहेत म्हणजे लक्षपूर्वक ऐका, म्हणजेच बोलण्याआधी आणि क्लिक करण्याआधी ऐकलेल्यावर विचार करा.
*छोटे डोळे :* डोळे लहान असले तरी बारकाईने पाहण्याचा संदेश देतात. ऑनलाईन कोणतीही लिंक, ईमेल किंवा मेसेज उघडण्याआधी बारकाईने तपासा.
गणपती आपल्याला शिकवतात की *“बुद्धीला लावलेला विवेकाचा अंकुश”* हेच खरं शस्त्र आहे. सायबर क्राईमपासून बचाव करण्यासाठी पासवर्ड सुरक्षित ठेवणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती उघड न करणे ही आपली जबाबदारी आहे.
आजचा गणेशोत्सव केवळ पारंपरिक पूजेपुरता मर्यादित न ठेवता, डिजिटल जीवनात सुद्धा ‘विघ्नहर्त्याचा’ संदेश घेऊन आपण सर्वांनी सायबर क्राईमविरुद्ध सजग नागरिक होणे गरजेचे आहे.

गणेशोत्सवाच्या सर्वांना सुरक्षित आणि हार्दिक शुभेच्छा🙏
डॉ. अक्षय फाटक
9420203499
रत्नागिरी

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.