Thursday, July 31, 2025

Latest Posts

गरोदर पोलिस महिलेच्या मृत्यूने पोलिस खाते गहिवरले

रत्नागिरी: पोलिस अधिक्षक कार्यालयातील महिला कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हेड काँस्टेबलचा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेली असताना आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.
     सांची सुदेश सावंत (३८,रा.हेरिटेज सोसायटी, आरोग्य मंदिर,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या महिला पोलिस कर्मचार्याचे नाव आहे. ती नउ महिन्यांची गरोदर होती. गुरुवारी रात्री तिच्या नातेवाईकांनी तिला प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी तिला अचानकपणे आकडी आल्याने ती बेशूध्द पडली.तिला अधिक उपचारांसाठी दुसर्‍या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी  उपचारांदरम्यान शुक्रवारी दुपारी ३वाजून १८ मिनिटे वाजण्याचा  सुमारास तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सांची सावंत हिचे पतीही पोलिस विभागातील श्वान पथकात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत असून या दाम्पत्याला दोन मुली आहेत. सांची ही  तिसर्‍यावेळी गरोदर असताना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. परंतू शुक्रवारी सकाळी तिला आकडी येउन ती बेशूध्द पडली. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी तिला शहरातीलच दुसर्‍या खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितल्यावर सांचीच्या पतीने तिला तातडीने दुसर्‍या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. दुर्दैवाने तिचे मुलही दगावले असून सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी ४.३० वाजता  उत्तरीय तपासणीसाठी सांचीचा मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात नेण्यात आला.
     दरम्यान सांचीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच पोलिस अधिक्षक कार्यालय, शहर पोलिस ठाणे, श्वान पथकातील पोलिस कर्मचारी तसेच शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल झाले होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.