रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या रत्नागिरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र ५ मधून भरघोस मतांनी निवडून आलेल्या हातखंबा गावच्या सून नगरसेविका आणि महिला बालकल्याण उपसभापती सौ. पूजा दीपक पवार यांचे गावच्या वतीने सत्कार करत कौतुक करण्यात आले. माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधत हातखंबा येथील योगायोग मित्रमंडळामार्फत सत्कार करण्यात आला.
उद्योजक दीपक पवार यांच्या अर्धांगिनी असलेल्या पूजा पवार या हातखंबा गावच्या सून आहेत. त्यांना सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड असून, प्रभाग क्र. ५ मध्ये त्यांनी नागरिकांसाठी आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत त्या प्रभाग क्रमांक ५ मधून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या. पूजा पवार यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून प्रभागातील नागरिकांनी भरघोस मतांचे दान त्यांच्या पदरात टाकले.
याबद्दल हातखंबा गावच्या वतीने पूजा पवार यांचा कौतुक सोहळा पार पडला. माघी गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना नगरसेविका झाल्याबद्दल योगायोग मंडळामार्फत करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, उद्योजक दीपक पवार, माजी सरपंच पूनम जौंजाळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



