हातखंबा, रत्नागिरी- हातखंबा गावातील एलपीजी टँकरमधील गॅस ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून तज्ञ टीमच्या मार्गदर्शनाखाली गॅस ट्रान्सफर करत आहेत.
गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यामुळे मुंबई – गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. ८ तासाहून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे क्रेनच्या साहाय्याने टँकर सरळ केला गेला आहे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी तीन ते चार तास लागणार. याठिकाणी ग्रामीण पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव घटनास्थळी आहेत.