चिपळूण : चिपळूण येथील वाशिष्ठी नदीत दोघांनी उड्या मारल्या. यामध्ये एक तरुणी आणि तरुणाचा समावेश. पाण्यात बुडणारे दोन्ही तरुण धुळे येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट. चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस शोध घेत आहेत. महिला बुडताना चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून उडी का मारली याचा तपास सध्या सुरू आहे.



