Friday, March 27, 2026

Latest Posts

जयगड ग्रामपंचायतीत ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्यदिन ग्रामपंचायत जयगड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जयगडचे माजी सरपंच अनिरुद्ध कमलाकर साळवी यांच्या हस्ते भारतीय तिरंग्याचे ग्रामपंचायत जयगडच्या प्रांगणात सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. भरपावसामध्ये ध्वजारोहण झाल्यावर राष्ट्रगीतानंतर, भारत माता जय हा जयघोष करण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचारी शिवम आंबुलकर यांनी सूत्रसंचालन केले. त्यांच्यासमवेत योगेश कामत व रवींद्र आठवले हे पोलीस कर्मचारी बांधव, तसेच भारतीय तटरक्षक पोत C 452 चे प्रधान अधिकारी रजनीश सिंह, तसेच श्री. संदीप, श्री. एस. एल. मोरे, प्रयाग वानखेडे हे सर्व केंद्र सरकारचे अधिकारी त्यांच्या सर्व कुटुंबीयांसमवेत या शुभप्रसंगी भारतीय तिरंग्याला मानवंदना देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

या प्रसंगी जयगडचे मान्यवर ग्रामस्थ, जयगड महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कमलाकर बोरकर, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष जितेंद्र पारकर, देवदास चव्हाण, नारायण चंद्रकांत काताळकर, निहाल नासीर खान, मंगेश कमलाकर साळवी, अनिल बाळू कांबळे, श्रीमती शिल्पा रूपसेन मेस्त्री, (माजी उपसरपंच), सौ.अंकिता गणेश मयेकर, सौ. सपना विशाल खाडे, सौ. प्रगती विकास निंबाळकर, सौ. नीरजा निकेश निंबाळकर, सौ. स्वरदा सुशांत पडवळ, श्रीमती श्रुती रूप सेन मेस्त्री, श्रीमती शलाका शशिकांत मेस्त्री, सौ. तमन्ना जहांगीर मंडल, सौ. नेत्रा नितीन पवार, सौ. वैष्णवी विश्वास पवार, सौ. रत्नप्रभा दत्तगुरु रहाटे, सौ. साक्षी सुनील खाडे, नासीर अब्बास दिवेकर, आरोग्य सेवक व्ही. जी. बाविस्कर, माजी सरपंच सौ. फरजाना अस्लम डांगे, माजी ग्रामपंचायत सदस्य मुन्ना संसारे, ग्रामपंचायत कर्मचारी सौ. सविता नयन खाडे, प्रमोद विठ्ठल झगडे, संतोष सुधाकर पवार, राज कमलाकर बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यावर ग्रामपंचायतीच्या सभागृहात उपस्थित सर्वांचे स्वागत माजी सरपंच अनिरुद्ध कमलाकर साळवी यांनी केले. उपस्थितांना राष्ट्रीय सणानिमित्त जिलेबीचे वाटप करण्यात आले. यानंतर भारतीय तटरक्षक पोतचे अधिकारी रजनीश सिंह प्रधान यांनी आपले मनोगत व्यक्त करून संपूर्ण जयगड ग्रामस्थांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय तटरक्षक दलाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यानंतर आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रम संपन्न झाला.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.