रत्नागिरी : १९ ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्हा फोटो व व्हिडिओ व्यावसायिकांची सहकारी संस्था मर्यादित, रत्ना. यांनी उद्या मंगळवारी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री नाम. डॉ उदय सामंत यांच्या सहाय्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकारांसाठी रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत कर्ज मेळाव्याचे आयोजन केले आहे. या कर्ज मेळाव्याला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा फोटो व व्हिडिओ व्यावसायिकांची सहकारी संस्थेमार्फत करण्यात आले आहे. उद्या मंगळवार दि.१९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी या कर्ज मेळाव्याचे आयोजन केले आहे.



