Tuesday, April 29, 2025

Latest Posts

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्यामार्फत कासारवेली येथे महाआरोग्य शिबिर

रत्नागिरी :  सामाजिक बांधिलकी जपत अविरत काम करणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी तर्फे कासारवेली येथे मोफत महाआरोग्य व नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . या शिबिराला कासारवेली परिसरातील नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला .
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आली. तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री ॲड महेंद्र मांडवकर यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि निसर्गाचे समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक उपक्रम म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात रोपवाटिकेत जलार्पण करून केली.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲड महेंद्र मांडवकर , तालुकाध्यक्ष मंदार नैकर, जिजाऊ सदस्य प्रशांत सनगरे , जिजाऊ सदस्य सुबहान तांबोली, कासारवेली ग्रामपंचायत सरपंच वेदिका बोरकर मॅडम, उपसरपंच वैभव बोरकर  , ग्राम पंचायत सदस्य गुरुनाथ शिरगावकर ,ग्रामपंचायत सदस्य दुर्वा नाईक , ग्रामपंचायत सदस्य सुगंधा कोलगे, ग्रामपंचायत सदस्य हेमांगी साखरकर , प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.
या शिबिराकरीता मुंबई ठाणे शहरातून तज्ञ डॉक्टर व नर्स उपस्थित होते अतिशय चांगल्या प्रकारे लोकाना सेवा दिली.या शिबिरात १८६ हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. तसेच ४७ हून अधिक नागरिकांनी डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली. याप्रसंगी ९९ रुग्णांना मोफत चष्मे देखील देण्यात आले.३ रुग्णांची जनरल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या आरोग्य शिबिरात उच्च रक्तदाब, मुतखडा , हर्निया , मुळव्याध, पिस्तुला अशा शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. नागरिकांची ई.सी.जी.  तपासणी पण करण्यात आली .याशिवाय सर्व आजारांवर मोफत आरोग्य सल्ला देण्यात आला. व मोफत औषध देखील ही देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजाऊ सदस्य शशिकांत गोताड यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कासारवेली ग्रामपंचायत सरपंच वेदिका बोरकर ,उपसरपंच वैभव बोरकर ,धनंजय नाईक,गुरुनाथ शिरगावकर ग्रामपंचायत सदस्य ,मृणाल आपटे,उदय चव्हाण ,नजिम मुल्ला ,ग्रामपंचायत सदस्य दूर्वा नाईक,सुगंधा कोलगे ग्रा. सदस्य,पूजा लाकडे ग्रा. सदस्य,दीपक पंचल,स्वप्नील पालकर ,मिलिंद पाटील,नामदेव शिवलकर ,जिकरिया कोटवडेकर ग्रा. सदस्य,इरफान साखरकर ,बापू बिरजे,हेमंगी साखरकर ग्रा. सदस्य,संजना बिरजे ,बापू शिवलकर ,विदेश कदम,बाळा आरेकर,रिटेश गुळेकर ,अमित शिंदे,अमित धांगड ,अखिल साखरकर,रुपेश चीचकर आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या उपक्रमातून सामाजिक आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांनी समाजासाठी योगदान दिले

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.