रत्नागिरी: प्रभाग क्र.४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अधिकृत उमेदवार श्री.नौसीन काझी तसेच महिला सर्वसाधारण उमेदवार सौ. मुनव्वर सुलताना फरान मुल्ला यांनी आज अर्ज भरला . प्रभाग क्रमांक चार मध्ये नौसीन काझी हे गेले कित्येक वर्ष समाजकार्य तसेच प्रभागातील विविध प्रश्न सोडवत आहे. त्यामुळे नौसिन काझी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभागातील व्यक्तींनी नौसीन काजी यांना शुभेच्छा दिल्या. नौसीन काजी यांनी बोलताना असे म्हटले आहे की प्रभागातील विविध प्रश्न जे अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. तसेच मुनवर फरान मुल्ला यांनी देखील प्रभागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे असा विश्वास उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिलेला आहे.



