रत्नागिरी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या वर्षा निमित्त राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यासाठी रत्नागिरी येथे प्राथमिक फेरी २३ व २४ ऑगस्ट २०२५ होणार आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी दिनांक १० ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. सदर स्पर्धेचे केंद्रप्रमुख श्री समीर इंदुरकर आणि समन्वयक म्हणून डॉ.आनंद आंबेकर श्री सुनील बेंडखळे यांची नियुक्ती केली आहे.
प्राथमिक फेरी झाल्यानंतर अंतिम फेरी १५ ते १८ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई येथे होणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी जास्तीत जास्त एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. शंभराव्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सर्व तरुण आणि हौशी रंगकर्मींना एकत्र आणण्यासाठी भव्य अशी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे .
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या कोकणातील जिल्ह्यांमध्ये नाट्यकला जोपासना हे अंगभूत कौशल्य आहे. सतत कलेमध्ये राहण्याची मानसिकता असल्यामुळे या केंद्रावर एकांकिका स्पर्धांची एक चांगलीच रंगत तयार होणार आहे तर सर्व रंगकर्मी ,महाविद्यालयातील विद्यार्थी या सर्वांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहेत स्पर्धेचे समन्वयक डॉक्टर आनंद आंबेकर ७०२०७३७४०० श्री सुनील बेंडखळे ७७०९५९४९५९ यांना सदर नंबर वरती संपर्क साधावा असे केंद्रप्रमुख श्री.समीर इंदुलकर यांनी आवाहन केले आहे.