Thursday, July 31, 2025

Latest Posts

तवसाळ शाळा १ च्या शुभ्रा सुर्वे हिचा शैक्षणिक डबल धमाका

गुहागर:  गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर १ ची विद्यार्थिनी कुमारी शुभ्रा निलेश सुर्वे हिची राजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड जाहीर झाली आहे.गुहागर तालुक्यामधुन जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पात्रता परीक्षेत पाच विद्यार्थ्यांमध्ये शुभ्रा सुर्वे हिचा अग्रक्रमांक(९२%) आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालांमध्ये गुहागर तालुका ग्रामीण विभागातून शुभ्रा सुर्वे हिने पुन्हा प्रथम क्रमांक(७२%) पटकावला आहे .शुभ्राने इयत्ता पहिलीपासुनच आपल्या सर्वांगीण शैक्षणिक कौशल्याची चुणूक दाखवली आहे. शालेय स्तर, केंद्र स्तर,बीट स्तरावर विविध स्पर्धांमध्ये तिने आपले कौशल्य दाखवून दिले होते.वकृत्वामधे तीचे विशेष नैपुण्य आहे.शुभ्राच्या यशामध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर १ चे मुख्याध्यापक श्री संदीप खंडगावकर,सहशिक्षक श्री रविंद्र राठोड यांचे मोलाचे योगदान आहे. शुभ्राच्या यशस्वीतेसाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तवसाळ पंचक्रोशीचे खोत मोहनबंधु गडदे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री जगदीश गडदे, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष श्री विज्ञान सुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री सत्यवान गडदे, ग्रामपंचायत उपसरपंच श्री प्रसाद सुर्वे, अंगणवाडी सेविका श्रीमती छाया सुर्वे, राजेश सुर्वे,प्रदीप सुर्वे, श्याम गडदे, विजय शिवकर, उदय शिरधनकर,मनिषा मयेकर,प्रितम सुर्वे,कीरण गडदे,मोहिनी सुर्वे, मनस्वी सुर्वे,अभिसलाम वाडकर, हर्षदा गडदे, केंद्रप्रमुख चिपळूणकर सर यांनी अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचाली करता अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.
“कल्पवृक्ष” या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या तवसाळच्या सुर्वे परिवारातील नवोदय विद्यालयांमध्ये पात्रता परीक्षा चांगल्या गुणांनी पास होऊन प्रवेश घेणारी शुभ्रा ही “५ वी” विद्यार्थिनी आहे. श्री रोहन प्रमोद सुर्वे, सौ ऋतुजा रोहन सुर्वे, कु.मृण्मयी जयंत सुर्वे, कु,सार्थक सचिन सुर्वे या विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालया मधून आपले शिक्षण पुर्ण यशस्वी उज्वल भविष्याकडे वाटचाल केली आहे.  उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामधील भाजपाचे नेतृत्व करणारे श्री.निलेश विश्वनाथ सुर्वे आणि काताळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे यांची शुभ्रा ही थोरली कन्या आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.