रत्नागिरी : रत्नागिरी तालुका प्राथमिक शिक्षक प्रीमियर लीग (TPL) भव्य क्रिकेट स्पर्धा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी दिनांक २१,२२ मार्च २०२५ रोजी मालगुंड येथे डॉ नानासाहेब मयेकर क्रीडानगरी खारभूमी येथे उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडल्या.
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना सहा संघांमध्ये लिलाव पद्धतीने विभागण्यात आले होते. या संघामध्ये मध्ये जय भैरी संघमालक सचिन झरवे, संदेश वासावे, कोकरे फायटर्स संघ मालक चंद्रकांत कोकरे, एकांत इलेव्हन संघ मालक संतोष रावणंग, NP रायडर्स संघ मालक दीपक नागवेकर, मनोज पागदे, SB six हीटर्स संघ मालक संजय बैकर, दीपक खेडेकर, आणि GS सुपरस्टार संघ मालक शंकर कळंबटे असे सहा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सदर स्पर्धा तालुक्यातील विविध ठिकाणी दरवर्षी भरविण्यात येत असते या वर्षी हे स्पर्धेचे ५ वर्ष आहे आणि त्यानिमित्त ही भव्य क्रिकेट स्पर्धा मालगुंड (गणपतीपुळे) येथील डॉ नानासाहेब मयेकर क्रीडा नगरी खारभूमी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.