रत्नागिरी: सोमवारी दुपारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील निवेंडी गावात अवकाळी पावसाला सुरुवात. विजांचा कडकडाटासह पावसाला सुरुवात. हवामान खात्याने अधिक पावसाच्या अंदाजाची माहिती दिली आहे, आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. विजांच्या गडगडडाटासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.