Monday, April 28, 2025

Latest Posts

दामले विद्यालय- शिक्षणाचा वसा, वारसा आणि नूतन वास्तू सोहळा

रत्नागिरी:  माझ्या शिक्षणाची आणि जडणघडणीची सुरवात कोणत्या शाळेत झाली?? असं विचारलं तर मी माझ्या दामले विद्यालयाचं नाव अभिमानाने सांगेन. आपल्या सर्वांच्या आठवणींचं केंद्र, आयुष्याला आकार देणारी आणि माणूस म्हणून घडवणारी शाळा म्हणजे दामले विद्यालय …

गुणवत्तापूर्ण शिक्षण, भित्तिचित्रांसारख्या नवकल्पना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणि समर्पित शिक्षकवर्ग यांचा वारसा लाभलेल्या या विद्यालयाने गेल्या १०० वर्षांत हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य उजळवलं आहे.
आज जे काही आपण आहोत, ते या शाळेच्या शिक्षणानं आणि संस्कारांनी दिलेलं आहे.

आता शंभरहून अधिक वर्षे झालेल्या या शाळेच्या इतिहासात आता एक नवा, कोरा आणि अत्याधुनिक इतिहास लिहिला जाणार आहे.

माननीय पालकमंत्रिमहोदय, नामदार श्री उदयजी सामंत यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आता आपल्या शाळेची तीन मजली अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली नवीन वास्तू उभी राहणार आहे. अत्यंत आधुनिक असलेल्या या वास्तूत 1700 विद्यार्थ्यांना अतिशय आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण मिळणार आहे आणि या  कामाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी माननीय मंत्री महोदय स्वतः येत आहेत — हा प्रत्येक आजी/माजी विद्यार्थ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
13 एप्रिल,2025 रोजी सकाळी 10 वाजता हा समारंभ संपन्न होणार आहे.

म्हणूनच, या विशेष दिवशी आपण सर्वांनी एकत्र जमावं, आपल्या आठवणींना उजाळा देऊया आणि आपल्या अस्तित्वाचा आधार असलेल्या शाळेसाठी कृतज्ञता व्यक्त करूया.
पालकमंत्री नामदार श्री सामंत साहेबांच्या पुढाकाराने साकार होत असलेल्या या शाळेत सर्वसामान्य स्तरातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळणार आहे याचा  या शाळेची माजी विद्यार्थिनी म्हणून मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो.

या भूमिपूजन सोहळ्याला आपली उपस्थिती ही केवळ एक उपस्थिती नसेल, तर ती आपल्या शाळेबद्दलच्या प्रेमाची, नात्याची आणि ऋणनिर्देशाची एक जिवंत साक्ष असेल.

शाळेच्या प्रांगणात भेटूया — आपल्या दामले विद्यालयासाठी!
13 एप्रिल, सकाळी 10 वाजता

— माजी विद्यार्थिनी
प्रियदर्शनी नामजोशी

#माझीशाळा
#दामलेविद्यालय
# माजीविद्यार्थी
#कृतज्ञता
#आभारउदयसामंतयांचे

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.