रत्नागिरी: लांजा तालुक्यातीतल दुर्गम अशा माचाळ या गावात कुठलीही मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध नसल्यामुळे तेथील रहिवाशांना आरोग्याया समस्येत उपारासाठी अनेक अडाणी येतात. या गावापासून सुमारे 15-20 किमी पर्यंत कसलीही आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अशा ठिकाणी लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीराने तेथील ग्रामस्थ सुखावून गेले.
रत्नागिरी पासून साधारण 60-65 किमी अंतरावर असलेल्या दुर्गम अशा भागातील माचाळ या गावात लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी रक्तशर्करा तपासणी रक्तदाब तपासणी तसेच जनरल चेकअप करून देण्यात आले. चेक अप केल्यानंतर योग्य अशी औषधे तेथील ग्रामस्थांना मोफत देण्यात आली. ही सर्व औषधे एमजेएफ लायन डॉ. शिवानी पानवलकर, पिटर डिसुझा, एफडीसी सीओ, कुलस्वामी डिस्ट्रीब्युटर, आनंद फार्मा आणि लायन राहुल औरंगाबादकर यांनी स्पॉन्सर केली होती. त्यासाठी डॉक्टर शिवानी यांचे सहकार्य लाभले.
माळमधील त्या तपासणी शिबिरामध्ये वयस्कर ग्रामस्थांची संख्या जास्त होती. 100 वर्षाचे एक गृहस्थ यावेळी तिथे तपासणी साठी आले होते. या गावापासून सुमारे 15-20 किमी पर्यंत कसलीही आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अशा ठिकाणी आयोजित केलेले हे शिबिर खूप उपयोगाचे ठरले असे उद्गार ग्रामस्थांनी लायन्स क्लब रत्नागिरीचे आभार मानत काढले. या शिबिरासाठी क्लबच्या सर्व डॉक्टर्सचे खूपच मोलाचे सहकार्य मिळाले. सर्वजण एवढय़ा लांब हे सेवा कार्य करण्यासाठी उपस्थित राहिले. यामध्ये एम. जे. एफ. लायन डॉक्टर शिवानी पानवलकर, लायन डॉक्टर सचिन पानवलकर, लायन डॉक्टर गणेश कुलकर्णी, लायन डॉक्टर माधवी कुलकर्णी, लायन डॉक्टर अमोल झोपे, लायन्स आय हॉस्पिटलचे किशोर सूर्यवंशी आणि तात्या सावंत या सर्वांचे सहकार्य लाभले.
या शिबिरासाठी या सर्व डॉक्टर्स सोबतच अध्यक्ष एम.जे.एफ. लायन गणेश धुरी, एम.जे.एफ लायन पराग पानवलकर, सचिव लायन विशाल ढोकळे, लायन साक्षी धुरी, लायन श्रेया केळकर, लायन शामल शेठ, लायन स्नेहल राणे, एम.जे.एफ.लायन सुप्रिया बेडेकर, लायन प्रदीप हरचिरकर, लायन सिरत राणे इत्यादी लायन सदस्य उपस्थित होते. या शिबिराच्या आयोजनात शिपोशी गावाचे शहानावाज सरकार आणि पालू गावचे संतोष कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली.
या शिबिरात साधारण 35 ते 40 ग्रामस्थांची सर्व तपासणी करण्यात आली. सर्व डॉक्टर व लायन्स सदस्यांचे अतिशय सुंदर असे आदरातिथ्य ग्रामस्थांनी केले. मार्च महिना हा प्रांतपाल महिना म्हणून साजरा करायचा असतो आणि प्रांतपालांननी या महिन्याभरात करण्यासाठी दिलेल्या सेवा कार्यांपैकी एक विषय घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.