Wednesday, March 25, 2026

Latest Posts

नवजीवन विद्यालय फुणगूसमध्ये किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन

रत्नागिरी :  पुणे शहरातविविध हॉस्पिटलमध्ये आहारतज्ञ म्हणून 10 वर्षांचा अनुभव असलेल्या सौ आकांक्षा जोशी – बढे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते फुणगूसच्या माहेरवाशीण व विद्यालयाच्या माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान त्यांनी मनोगता दरम्यान व्यक्त केला
फार मोठा आर्थिक बोजा न पडता ग्रामीण भागातील उपलब्ध धनधान्ये वापरून समतोल व सकस आहार कसा घेता येईल याचे उत्तम मार्गदर्शन पी पी टी च्या माध्यमातून केले. आवळा, चिंच, अळू, पालेभाज्या, अळीव, कुळीथ, पेरू, चिकू, केळी यासारख्या परिसरातील उपलब्ध घटकातून आरोग्य चांगले राखता येते याचे उत्तम मार्गदर्शन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनिल पाटील सर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. व्याख्यानाचे आयोजन करिअर मार्गदर्शन विभागांतर्गत शाळेचे समुपदेशक श्री मंदार बापट यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री मंदार भागवत व आभार सौ पूनम खरात यांनी व्यक्त केले

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.