Monday, March 23, 2026

Latest Posts

नवीन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याशी संवादाचा कार्यक्रम १३ जून रोजी चिपळूणमध्ये

चिपळूण (प्रतिनिधी) : नुकतेच पदभार स्वीकारलेले जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याशी संवाद साधण्यासाठी शुक्रवार, दिनांक १३ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता ‘बाळासाहेब माटे सभागृह’, कापसाळ, चिपळूण येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सर्व समाजातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महिला दक्षता समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी बांधव, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बंधू, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्रकुमार राजमाने असून त्यांच्यासह श्री. फुलचंद मंगडे (पोलीस निरीक्षक, चिपळूण), श्री. आवासे पाटील (सहायक पोलीस निरीक्षक, साखर पो.ठाणे), आणि श्री. भरत पाटील (सहायक पोलीस निरीक्षक, अळोरे शिरगाव पो.ठाणे) हेही उपस्थित राहणार आहेत.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.