Wednesday, March 25, 2026

Latest Posts

पंचायत समिती सभापती पदाकरीता नागरिकांचा मागासप्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीची पदे नागरिकांचा मागासप्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या दालनात 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सभा आयोजित केली असल्याचे प्र. उपजिल्हाधिकारी (सा.प्र), चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्या एका प्राधिकृत प्रतिनिधीस पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाच्या सभेस उपस्थित राहता येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.