Tuesday, March 24, 2026

Latest Posts

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोकणटुडे दिनदर्शिका-२६ चे प्रकाशन

रत्नागिरी : कोकणटुडेच्या वतीने दरवर्षी  कोकणातील वेगवेगळ्या विषयांवर प्रसिद्ध होणार्‍या कोकणटुडे दिनदर्शिका-२६ चे प्रकाशन राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. यावेळी कोकणटुडेचे संपादक सुदेश शेट्ये व प्रणित शेट्ये उपस्थित होते.
कोकणातील निसर्गसौंदर्य सर्वांसमोर यावे या उद्देशाने कोकणटुडेच्या वतीने दरवर्षी कोकणातील छायाचित्रे असलेली दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाते. त्याला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असतो.
याआधी कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, देवस्थाने, कातळशिल्प व ड्रोनमधून कोकणातील निसर्गाची टिपलेली छायाचित्रे असलेली दिनदर्शिका प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी शहरात पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटनासाठी अनेक विकास कामे झाली आहेत. त्यामध्ये रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टी, थ्रीडी तारांगण, छत्रपती संभाजी स्मारक, थिबा पॅलेस येथे थ्रीडी मल्टीमिडिया शो आदी कामांचा समावेश आहे. यामुळे रत्नागिरी शहर आता अधिक स्मार्ट बनले आहे. म्हणूनच यावर्षी कोकण टुडेच्यावतीने आमची रत्नागिरी स्मार्ट रत्नागिरी ही थिम घेवून सचित्र दिनदर्शिका बनविण्यात आली आहे. त्याचे प्रकाशन नुकतेच सामंत यांच्या हस्ते पार पडले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.