रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्या येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. १५ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : पोलीस परेड ग्राऊंड, रत्नागिरी ) सकाळी ११ वाजता महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव, रानभाजी पाककला स्पर्धा, सिंधुरत्न समृध्द योजनेमधून शेतकऱ्यांना वाहनांचे अनुदान वितरण,जिल्हास्तरीय आंबा उत्पादक शेतकरी यांचेसाठी आयात-निर्यात कार्यशाळा, खरेदीदार व विक्रेता संमेलन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : अंबर हॉल, टि.आर.पी. ) सकाळी ११.३० वाजता शिरगांव, आडी येथील आडी मराठी शाळा नूतन वास्तूचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : आडी, मराठी शाळा ) दुपारी २ वाजता १. तारक मयेकर मित्रमंडळ आयोजित स्वातंत्र्यदिनानिमित्त एकदिवशीय तालुकास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा २०२५ येथे भेट. २. कोतवडे जि.प. गटातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: वि. रा.प. कोतवडे, इंग्लिश स्कूल, कोतवडे) दुपारी ३ वाजता कै. प्रदिपभाई सावंत यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट (स्थळ: सावंतवठार, नाचणे ) दुपारी ३.३० ते ४.३० वाजता राखीव. सायंकाळी ५ वाजता चॅम्पियन रेनी ट्रॉफी २०२५- रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, सिजन ४, बक्षिस वितरण समारंभास उपस्थिती (स्थळ : प्रमोद महाजन क्रिडा संकुल, रत्नागिरी) सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा रत्नागिरी आणि उदय सामंत प्रतिष्ठान रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने के. प्र.ल. मयेकर कथा लेखन स्पर्धा २०२५ च्या बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : हॉटेल विवेक सेमीनार हॉल ) सायंकाळी ७ वाजता वाटद जि.प. गटातील भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव.
शनिवार दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ वाजता राखीव (स्थळ : पाली) दुपारी २ वाजता राजापूर येथील दहिहंडी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : जवाहर चौक, राजापूर) दुपारी ३.३० वाजता शिवसेना संगमेश्वर तालुका व शिवसेना देवरुख शहर आयोजित दहिहंडी कार्यक्रम (स्थळ : एस.टी. आगारासमोर, देवरुख) दुपारी ४.३० वाजता डि. जे. सामंत कॉलेज, पाली येथील दहिहंडी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : डि.जे. सामंत कॉलेज, पाली) सायंकाळी ५.३० वाजता वाटद खंडाळा येथील दहिहंडी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : वाटद, रत्नागिरी) सायंकाळी ७ वाजता श्री प्रतिष्ठान आयोजित दहिहंडी कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : मांडवी किनारा, रत्नागिरी). सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्रौ १०.५० रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कॉकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं. २०११२) मुंबईकडे प्रयाण