रत्नागिरी: नवरात्रोत्सवातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा म्हणजे कुमारिका पूजन. या पारंपरिक पूजनाचा सोहळा प्रभाग क्र. १४ येथे सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकाराने भक्तिभावाने पार पडला.या प्रसंगी प्रभागातील सर्व कुमारिकांना आमंत्रित करण्यात आले होते. सर्व मुलींना आदरपूर्वक बोलावून त्यांचे विधीवत पूजन करण्यात आले. पूजनानंतर त्यांना खाऊ, प्रसाद तसेच देवीची प्रतिमा देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
कुमारिका पूजनाचे महत्त्व
हिंदू धर्मात कुमारिका पूजनाला विशेष स्थान आहे. नवरात्रीत कुमारिका हीच देवीचे रूप मानली जाते. कुमारिकांच्या पूजनातून देवीचा आशीर्वाद मिळतो, घरामध्ये सुख-समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी या विधीला मोठे महत्त्व दिले जाते.
सौ. वर्षा ढेकणे यांनी या पूजनाचे आयोजन करून प्रभागातील सर्व मुलींना एकत्र आणत नवरात्रोत्सवातील भक्तिभाव, परंपरा आणि संस्कार यांचे दर्शन घडविले.



