रत्नागिरी: मुंबई- गोवा महामार्गावरील हातखंबा येथील शाळेजवळ गॅस टँकर पलटी झाला आहे. ही घटना रात्री ११.३० नंतर घडली असून गॅस लिकेज होत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. खबरदारी म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलिस दल आणि आपत्कालीन टीम या ठिकाणी रवाना झाली आहे. या परिसरात नागरिकांना न जाण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे देखील आव्हान प्रशासनाने केलेले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितिन बगाटे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.