Monday, March 23, 2026

Latest Posts

भाजपातर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका भाजपाच्या कार्यकारणी मार्फत माध्यमिक विद्यामंदिर नाणीजच्या ५१ आणि  नाणीज जि. प. शाळा क्र. १ मधील ३६  गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम भाजपा तालुकाध्यक्ष संयोग उर्फ दादा दळी तसेच नाणीज  शिक्षण मंडळाचे सचिव सुधीर कांबळे    मुख्याध्यापिका रुपाली सावंतदेसाई यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष चिराग खटकुळ, शिक्षक सेल तालुकाध्यक्ष विजय गावडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्ताराम खावडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रीराम दाणी, तालुका कार्यकारणी सदस्य प्रकाश गुरव, युवा कार्यकर्ता पार्थ पंडीत उपस्थित होते.
     उपस्थितांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापका रुपाली सावंतदेसाई आणि श्रीराम दाणी यांनी गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
      शुभेच्छापर मनोगतातून दादा दळी  यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये गरजूंना शैक्षणिक मदत करण्याचे काम सुरू आहे. याच सामाजिक जाणिवेतून नाणीज मधील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  जि.प. शाळेतील शिक्षक मनोजकुमार खालविलकर त्यांच्यासह शिक्षक वृंद उपस्थित होते.  सूत्रसंचालन वाघरे सर यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.