रत्नागिरी : महिला मोर्चा आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांनी पक्षाच्या सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल भाजपा कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
भाजपा संघटन पर्व अंतर्गत राज्यभरात सभासद नोंदणी सुरू असून प्राथमिकता सदस्यता नोंदणी अभिमानामध्ये ढेकणे यांनी १००० वैयक्तिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले. त्याबद्दल त्यांचे चव्हाण यांनी अभिनंदन केले. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र हे ध्येय साकार करण्यासाठी भाजपा अधिकाधिक सशक्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी हे राष्ट्र कार्य आपण असे अविरत सुरू ठेवाल असा विश्वास चव्हाण यांनी पत्राद्वारे व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
