Thursday, March 26, 2026

Latest Posts

भारतीय जनता पार्टीच्या सिंदूर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी येथे भव्य सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे आयोजन महिला शहराध्यक्ष सौ. पल्लवी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे यांनी केले, तर अध्यक्षस्थानी सौ. वर्षा ढेकणे होत्या. या रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीदरम्यान भगव्या पताका, पारंपरिक वेशभूषा आणि सिंदूर लावलेली शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. रॅलीतून महिला शक्तीचा जागर करण्यात आला.
  कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून, रत्नागिरी शहरात भाजप महिला मोर्चा सशक्तपणे कार्यरत असल्याचे या रॅलीतून दिसून आले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.