रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित महिलांचे इनडोअर टर्फ विकेट टेनिस सॉफ्ट बॉल क्रिकेट स्पर्धा नुकतेच आर्टिफिशल टर्फ मैदान, कृषी उत्पन्न बाजार समिती, शांतीनगर, रत्नागिरी येथे झाली.
या स्पर्धेचे विजेतेपद पॉवर हिटर्स गर्ल्स या संघाने पटकावले. तर उपविजेतेपट पी जी एस खंडाळा संघाने पटकावले.
आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली होती.
उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते हा बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला.
या वेळी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन सचिव बिपिन बंदरकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी, उपाध्यक्ष दीपक देसाई, बलराम कोतवडेकर, दीपक पवार, सुनील घोसाळकर, अमित लांजेकर, प्रतिक सावंत व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दिशा साळवी, स्मितल पावसकर, कांचन नागवेकर, पूजा पवार , मनिषा बामणे, नंदिता सावंत , राजन शेट्ये, प्रकाश शिंदे, रुपेश पेडणेकर, निलेश मुळे , बाळू गांगण, अमित बने उपस्थित होते.
विजेता पॉवर हिटर्स गर्ल्स संघाला रोख रक्कम १५००० व चषक, उपविजेता पी.एस.डी. खंडाळा संघाला १०००० रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात आले.
तृतीय क्रमांक जी जे सी ९५ गोल्डन फॅमिली गर्ल्स ग्रुप,
चौथा क्रमांक हिरकणी संघानी पटकावला. त्यांना प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील मालिकावीर पी.एस.डी. खंडाळा संघातील मनाली निमरे हिला २ हजार रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज पी.एस.डी. खंडाळा संघातील सानिया महाकाळ हिला १ हजार रोख रक्कम व चषक, उत्कृष्ट गोलंदाज पी.एस.डी. खंडाळा संघातील मनाली निमरे हिला १ हजार रोख रक्कम व चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हिरकणी संघातील नंदिता सावंत हिला 1 हजार रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उगवता तारा जी जे सी ९५ गोल्डन फॅमिली गर्ल्स ग्रुप संघातील कीर्ती सौरव हिला 1 हजार रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर पॉवर हिटर्स गर्ल्स संघाची मनीषा शितप हिला १ हजार रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महिलांच्या एकूण १२ संघानी भाग घेतला होता.

