चिपळूण : तालुक्यातील मांडकी-पालवण येथील कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या भव्य क्रीडांगणावर शासन पुरस्कृत, राज्यस्तरीय ग्रामीण,कृषी व सहकार साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा उद्घाटन सोहळा आज (५ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता संयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांचे हस्ते संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे, स्मरणिका छपाई समिती अध्यक्षा सौ. अंजली चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण, साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धी व प्रचार समिती प्रमुख डॉ. शमिका चोरगे, संस्थेचे सचिव मिलिंद सुर्वे, प्राचार्य डॉ. संकेत कदम ,प्राचार्य सचिन तांबेकर व रावसाहेब सुर्वे उपस्थित होते.



