Friday, March 27, 2026

Latest Posts

मांडवी किनारी स्वच्छता अभियानात मत्स्य महाविद्यालयाचा सहभाग

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता अभियानांतर्गत आज (२० सप्टेंबर) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगांव (रत्नागिरी) येथील मत्स्य महाविद्यालयाच्या वतीने मांडवी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Earth) राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्राने (National Centre for Coastal Research) प्रायोजित केलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या १०० विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी मांडवी समुद्र किनाऱ्यावरील २०० मीटर लांब व ४० मीटर रुंद परिसरातील सुमारे १.२६ टन कचरा गोळा केला गेला. या कचऱ्यातील प्लॅस्टिक, रबर, काच, कपडा आदी प्रकारच्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
या स्वच्छता अभियानाच्या संयोजन समितीचे समन्वयक म्हणून डॉ. रवींद्र पवार, सह-समन्वयक म्हणून डॉ. भावेश सावंत यांनी, तर सदस्य म्हणून डॉ. सुहास वासावे, डॉ. अनिरुद्ध अडसूळ, डॉ. संतोष मेतर, डॉ. संदेश पाटील, डॉ. अजय देसाई, भालचंद्र नाईक यांनी नियोजन केले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. आसिफ पागारकर, डॉ. दबीर पठाण, डॉ. राहुल सदावर्ते, डॉ. जयाप्पा कोळी, डॉ. मनिषा सावंत, श्री. मकरंद शारंगधर, डॉ. गजानन घोडे, डॉ. राजू तिबिले, डॉ. विजय मुळ्ये, डॉ. (सौ.) संगीता वासावे, डॉ. (सौ.) वर्षा भाटकर, डॉ. मंगेशकुमार पाटील, श्री. साईप्रसाद सावंत, श्रीमती मीनल काळे, श्रीमती प्रज्वला बागुल, अण्णासाहेब कारखिले, श्रीमती काजल राठोड, कु. मोनाली कोकाटे, अरूण गौड, मयुरेश नागवेकर, प्रतीक यादव, मंगेश चापडे आदींनी सहभाग घेतला. तसेच सागरी सीमा मंच चे पदाधिकारी संजीव लिमये व रंजन आगाशे या मोहिमेत सहभागी झाले. या कार्यक्रमाला रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे व माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचे सहकार्य लाभले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.