Wednesday, April 30, 2025

Latest Posts

मांडवी समुद्रकिनारी  अत्याधुनिक टॉयलेटचे उद्घाटन

रत्नागिरी :  पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या  रत्नागिरी जिल्हयाच्या सागरी किनाऱयांवर पर्यटकांच्या सुखसुविधेसाठी ‘सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट’च्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील मांडवी किनाऱ्यावर भाजपा कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या स्वखर्चातून सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटस युनिट बांधण्यात आले आहे. या युनिटचे उदघाटन रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळी केले. 
   भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे ‘सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट’ विथ ‘बायो डायजेस्टर’चे 9 युनिट आणि चेजिंग रुमच्या एकूण 9 युनिट करिता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी 5 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यातून ही सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटस युनिटी सुविधा उपलब्ध झाली आहे. येथे पाच रुपयात ही सुविधा पर्यटकांना घेता येणार आहे.   मांडवी येथे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटस युनिटा शुभारंभ भाजपा कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांयाहस्ते करण्यात आला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपाच्या महिला मोर्चाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव शिल्पा मराठे, कार्यकारिणी सचिव परशुराम ढेकणे, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, अशोक मयेकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, उमेश कुलकर्णी, सौ. पल्लवी पाटील, सौ. सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होती.  जिल्हय़ातील विविध शहरांमध्ये ही अत्याधुनिक टॉयलेट उपलब्ध करणार   आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.पर्यटकांची ही गैरसोय दुर होईल व पर्यटकांना चांगली सोयी सुविधा मिळणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.