रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत उद्या (१ फेब्रुवारी) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा सविस्तर दौरा असा : शनिवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईवरून रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण. सकाळी ६.१५ वाजता शासकीय विश्रामगृह माळनाका रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह माळनाका रत्नागिरी येथून संगमेश्वरकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता मौजे वांद्री अंगणवाडी (ता. संगमेश्वर) येथे भेट, सकाळी ११.१५ वाजता स्वीय सहाय्यक ॲड. अरुण नागवेकर यांच्या वांद्री (ता. संगमेश्वर) येथील निवासस्थानी माघी गणेश उत्सवानिमित्त भेट, दुपारी १ वाजता उद्योजक रवींद्र शिंदे यांच्या खेर्डी (ता. चिपळूण) येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट.
दुपारी १.३० वाजता चिपळूण शहरातील आदर्श क्रिडा आणि सामाजिक प्रबोधिनी काविळतळी येथील माघी गणेश जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थिती. संदर्भ : श्री सचिन (भैय्या) कदम, उपशहरप्रमुख चिपळूण. दुपारी २ वाजता रत्नागिरी जिल्हा तेली समाज प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेला उपस्थिती, स्थळ : पवन तलाव मैदान ता. चिपळूण, संदर्भ : विनोद झगडे, तालुकाप्रमुख, चिपळूण. दुपारी २.३० वाजता चिपळूण शहरातील श्री गणपती देव मंदिर राऊत आळी श्रींचा माघी जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थिती. ता. चिपळूण, संदर्भ : समीर राऊत विभागप्रमुख व किशोर राऊत उपविभागप्रमुख ता. चिपळूण. दुपारी ३ वाजता चिपळूण शहरातील पाग येथील युनिटी क्रिडा मंडळ आयोजित श्री माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त भेट, ता. चिपळूण, संदर्भ : विकी नरळकर, उपशहरप्रमुख चिपळूण.