रत्नागिरी : गुरुवार दिनांक,३१/७/२०२५ रोजी मिरकर मार्शल आर्ट्स अँड फिटनेस सेंटर गोडबोले स्टॉप रत्नागिरी येथे कराटे विद्यार्थ्यांची बेल्ट ग्रेडिंग टेस्ट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
वर्ल्ड फुनाकोशी शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन या राष्ट्रीय कराटे संस्थे मार्फत मिरकर मार्शल आर्ट्स अँड फिटनेस सेंटर गोडबोले स्टॉप रत्नागिरी येथे कराटे विद्यार्थ्यांसाठी बेल्ट ग्रेडिंग टेस्ट आयोजित करण्यात आली होती. ही बेल्ट ग्रेडिंग टेस्ट रत्नागिरीतील वर्ल्ड फुनाकोशी शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन चे प्रमुख प्रशिक्षक श्री. जावेद मिरकर यांच्या उपस्थितीत प्रशिक्षक. नौशिन कापडी व प्रशिक्षक. अयान मिरकर यांनी पार पाडली.
या बेल्ट ग्रेडिंग टेस्ट मध्ये मिरकर मार्शल आर्ट्स अँड फिटनेस सेंटर च्या ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांनी कराटे चे वेग वेगळ्या स्तरावर कौशल्य दाखवून यश प्राप्त केले, नुकताच या विद्यार्थ्यांचा प्रमाण पत्र वितरण सोहळा मिरकर मार्शल आर्ट्स अँड फिटनेस सेंटर येथे पार पडला, तेव्हा या संस्थेचे संचालक श्री. जावेद मिरकर तसेच जिल्हा कराटे दो असोसिएशन रत्नागिरी या संस्थेचे सचिव श्री. सूरज बने, व खजिनदार श्री. अरुण बेग व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराटे बेल्ट ग्रेडिंग टेस्ट च्या वेग वेगळ्या स्तरावर या सर्व कौशल्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणी प्रमाणे प्रमुख पाहुणे श्री. सूरज बने व श्री. अरुण बेग यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रके व बेल्ट देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल जिल्हा कराटे दो असोसिएशन चे सचिव श्री. सूरज बने व खजिनदार श्री. अरुण बेग यांनी प्रशिक्षक.नौशिन कापडी प्रशिक्षक.अयान मिरकर तसेच सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे कौतुकास्पद शब्दांत अभिनंदन केले.



