रत्नागिरी : रत्नागिरी मधील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गांमुळे होत असलेली जीवितहानी रोखण्यासाठी तसेच JSW पोर्ट लिमिटेड या कंपनीच्या वाहनाकडून वारंवार होणारे अपघात याबाबत तातडीने उपाययोजना करून यास जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपन्याविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणी आज मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांनी मा. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्याकडे केली आहे
गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेला मुंबई गोवा महामार्ग त्याच बरोबर सध्या सुरू असलेल्या मिऱ्या नागपूर महामार्गाच्या ठेकेदारांकडून योग्य ती उपाययोजना न केल्याने तसेच मनमर्जी, बेपर्वाई कामगिरी मुळे रत्नागिरी तालुक्यातील व परिसरातील अनेक पादचारी , नागरिक हे हकनाक जीवास मुकले आहेत , त्याचबरोबर सध्या शासन आणखी काही नवीन महामार्गाच्या भू संपादनाच्या प्रक्रियेत देखील आहे, परंतु येथील नागरिकांच्या जीवास धोका उद्भवणार असेल तर असा विकास मनसे पक्षाला मान्य नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इथल्या विकासात्मक कामाला विरोध नाही परंतु येथील सर्वसामान्य नागरिकांना या विकासाच्या नावाखाली जीवतास मुकावे लागत असेल तर मनसे आपल्या पद्धतीने याविरोधात संघर्ष करण्यास तयार आहे असे मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे
अलीकडील काळात अनेक अपघात या महामार्गाच्या ईगल infrastructure रवी इन्फ्रा लिमिटेड यासारख्या अनेक ठेकेदारांच्या बेपर्वा कामकाजामुळे घडले आहेत..तसेच JSW port Ltd या कंपनीसाठी काम करणाऱ्या अवजड वाहनांकडून निवळी गणपतीपुळे राज्य महामार्गावर सातत्याने अपघात होत असून संबंधित पीडित व्यक्तींना वा त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई देखील देण्यात आलेली नाही ज्याचा मनसेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.मनसेच्या वतीने या ठेकेदार कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच यापुढे या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात हे सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यास पात्र ठरावेत अशी स्पष्ट व आग्रही मागणी मनसेच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मा. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तत्परतेने संबंधितांची बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी निवेदन देताना जिल्हाधिकाऱ्यांना मनसे तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष श्री राजू पाचकुडे, श्री विशाल चव्हाण, विभाग अध्यक्ष श्री.सोमनाथ पिलणकर , सागर मयेकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
