Saturday, March 21, 2026

Latest Posts

मुर्शी गावात शासनाच्या वैयक्तिक योजना घराघरात पोहोचविण्याच्या कार्याचे आमदार किरण सामंत यांनी केले कौतुक

संगमेश्वर : मुर्शी गावातील नागरिकांना शासनाच्या विविध वैयक्तिक योजना प्रत्यक्ष घराघरात जाऊन पोहोचविण्याचे काम स्थानिक ग्रामपातळीवर करण्यात आले. यामुळे गावातील अनेक कुटुंबांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळाला आहे. या उपक्रमाचे आमदार किरण सामंत यांनी विशेष कौतुक केले.
   यावेळी आमदार सामंत म्हणाले की, “जनतेच्या दारात योजना पोहोचल्या पाहिजेत, तेव्हाच शासनाचा उद्देश पूर्ण होईल. मुर्शी गावाने या दिशेने घेतलेले पाऊल कौतुकास्पद आहे.” मुर्शी (ता. संगमेश्वर) येथे आमदार किरण सामंत यांच्या गावभेट दौऱ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गावातील नागरिकांनी विविध प्रश्न, अडचणी व विकासासंबंधीच्या मागण्या आमदारांसमोर मांडल्या.
आमदार सामंत यांनी ग्रामस्थांच्या समस्या काळजीपूर्वक ऐकून तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या वैयक्तिक योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यावेळी आमदार सामंत म्हणाले की, “गावागावात जाऊन थेट जनतेशी संवाद साधणे ही माझी जबाबदारी आहे. प्रत्येक गावाचा विकास आणि नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी मी नेहमी तत्पर राहणार आहे.गाव भेट दौऱ्यामुळे अनेकांच्या प्रश्नांना मिळाला न्याय… ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांचे मानले आभार मुर्शी (ता. संगमेश्वर) येथे आमदार किरण सामंत यांच्या गाव भेट दौऱ्यामुळे अनेक ग्रामस्थांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांना तात्काळ न्याय मिळाला. ग्रामस्थांनी थेट आमदारांसमोर आपल्या समस्या मांडल्या आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन मिळाले.

आमदार किरण सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागीच सूचना देऊन काही प्रश्न मार्गी लावले, तर उर्वरित प्रश्नांचा नजीकच्या काळात निपटारा केला जाईल, असे स्पष्ट केले.

यामुळे समाधान व्यक्त करत ग्रामस्थांनी आमदार सामंत यांचे आभार मानले. “आमदार थेट गावात येऊन ऐकून घेतात, हीच खरी ताकद आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला नवी गती मिळते,” असे ग्रामस्थांनी सांगितले.

👉 *मुर्शी ता. संगमेश्वर येथे काजळी नदीवरील धरणासाठी निधी उपलब्ध करून कायमस्वरूपी पाणीप्रश्न मार्गी लावणार – आमदार किरण सामंत*
मुर्शी (ता. संगमेश्वर) गाव भेटीच्या दौऱ्यात आमदार किरण सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण घोषणा केली. गावाचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काजळी नदीवर धरण बांधण्याकरिता आवश्यक निधी शासनाकडून आणला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

*आमदार  किरण सामंत म्हणाले की, “गावाच्या प्रगतीसाठी पाणी हा सर्वात मोठा पाया आहे. शेती, घरगुती वापर तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला तर गावातील विकासकामांना नवी दिशा मिळेल. काजळी नदीवरील धरण हे त्यासाठीचे प्रभावी समाधान ठरणार असून, त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करून निधी आणणार आहे.”*
यावेळी ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार सामंत यांचे आभार मानले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, अधिकारी , पदाधिकारी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.