Thursday, February 26, 2026

Latest Posts

मैत्री ग्रुप आयोजित कोकम करी रेस्टॉरंट प्रस्तुत रत्नागिरी पाककला महास्पर्धा


वारसा अस्सल कोकणी चवीचा –
कोकणच्या चवीचा अविस्मरणीय उत्सव रत्नागिरी जिल्ह्यात कोकणच्या समृद्ध, पारंपारिक आणि लुप्त होत चाललेल्या रेसिपींचा वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली रत्नागिरी पाककला महास्पर्धा २०२६, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी अंबर हॉल टी. आर. पी. येथे उत्साहात आणि दिमाखात पार पडली.
या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर तसेच शहर परिसरातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. हॉटेल कार्निव्हलचे संचालक श्री. उदयजी लोध, तूरळ संगमेश्वर येथील रस्टिक हॉलिडेज च्या संचालिका सौ. शिल्पा करकरे आणि नवनिर्माण हॉटेल मॅनेजमेंट च्या प्राध्यापिका शेफ मेघना शेलार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत तब्बल १५० रेसिपींची नोंदणी झाली होती. त्यापैकी काटेकोर परीक्षणानंतर ७५ रेसिपी अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या. आज अंतिम फेरीत संपूर्ण जिल्ह्यातील ७५ महिला स्पर्धकांनी परीक्षकांसमोर लाईव्ह पाककला सादर केली. जिल्ह्यात अशी लाईव्ह स्पर्धा पहिल्यांदाच झाली असे स्पर्धकांनी सांगितले. सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०५:००  या वेळेत विविध पारंपारिक, नाविन्यपूर्ण आणि घरगुती चवींचा अनोखा मेळ अनुभवायला मिळाला.
स्पर्धेचे परीक्षण खालील पाच निकषांवर आधारित होते –
चव (Taste)
सुगंध (Aroma) / पोत (Texture)
पदार्थासाठी लागणारी सामग्री व कृती
स्वच्छता (Hygiene)
सजावट (Garnishing)
वरील सर्व निकष काटेकोरपणे लागू करण्यात आले.
बक्षीस समारंभ रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रमेशजी किर यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
ह्या कार्यक्रमात
सौ. नमिता किर
सौ. श्वेता काळोखे
श्री. महेश सावंत
श्री. उमेश (भाई) वायंगणकर
श्री. जयेश पटेल
श्री. श्रेयश सावंत
डॉ. नितीन सनगर
श्री. रश्मीन दुर्वे
श्री. नितीन करकरे
श्री. अमोल मोरे यांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. पाककलेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सुहाना मसाले यांचेकडून गिफ्ट हॅम्पर दिले गेले तसेच राघव एंटरप्रायझेस कडून अंतिम महाविजेत्याला एक विशेष भेट दिली व सर्व स्पर्धकांना खरेदीवर 30% डिस्काउंट ऑफरची कुपन देण्यात आली. सर्वच स्पर्धकांनी विशेष मेहनत घेतली असल्यामुळे परीक्षकांच्या परीक्षणाचा कस लागला होता असं परीक्षकांनी बोलून दाखवले. स्पर्धेचे निकाल जाहीर झाले ते ह्याप्रमाणे, *सौ. प्रज्ञा जयंत फडके, रत्नागिरी यांनी कायनाचं पिठलं ही लुप्त आणि शिवकालीन रेसिपी बनवून अंतिम महाविजेत्या (सर्व श्रेणीतून नंबर एक ) म्हणून यांना घोषित करण्यात आले.*
शाकाहारी श्रेणी
प्रथम – सौ. श्रावणी संतोष मयेकर, चोळक्या भाकरी व हिंग चटणी.
द्वितीय – सौ. सुलभा फणसळकर, खतखत.
तृतीय – सौ. विद्या विनायक शिर्के, ओल्या नारळाचे गोड वडे.

मत्स्याहारी –
प्रथम – सौ. मीनाक्षी आतिष किर, खेकडा भुर्जी.
द्वितीय – सौ. अंतरा राहुल कळंबटे, पानगा मासा.
तृतीय – सौ. अवंतिका राकेश तिवरेकर, झटपट मुळ्याचं कुवल.
मांसाहारी श्रेणी
प्रथम – सौ. स्वप्नाली संजय भागवत, मातीच्या भांड्यातील काळं चिकन.
उत्तेजनार्थ – सौ. साक्षी समीर चव्हाण, कुळथाची थाळी.
उत्तेजनार्थ – सौ. संगिता संदीप आंबेरकर, भरला बोंबील फ्राय.
श्री. रमेश किर यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी असे म्हटले की स्वयंपाक घरातील गृहिणीना प्रतिष्ठा देणारी ही स्पर्धा आहे, तसेच डेस्टिनेशन रत्नागिरी साठी सर्व हॉटेल्सना ह्या रेसिपी मिळाव्यात, ह्या जुन्या रेसिपिंचा एक दस्ताऐवज बनवावा जेणेकरून ह्याचा एक रेकॉर्ड राहील. प्रस्तावनेत बोलताना मैत्री ग्रुपचे संचालक कौस्तुभ सावंत यांनी म्हटलं की व्हेज रत्नागिरी किंवा चिकन रत्नागिरी नावाची डिश रत्नागिरी च्या सर्व हॉटेल्स च्या मेनू कार्ड मध्ये असावी अशी इच्छा व्यक्त केली.
ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा नव्हती, तर कोकणच्या पारंपारिक चवींचा, लॉस्ट रेसिपींचा आणि घराघरातील संस्कृतीचा एक भव्य उत्सव ठरली. जिल्ह्यातील महिलांनी आपल्या कलेचा उत्कृष्ट आविष्कार सादर करून कोकणच्या खाद्यसंस्कृतीला नवी ऊर्जा दिली.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून उपस्थित मान्यवर, परीक्षक व स्पर्धक यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
कोकणची चव, कोकणचा अभिमान – रत्नागिरी महा पाककला स्पर्धा 2026! 🍲✨

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.