Tuesday, March 24, 2026

Latest Posts

योगायोग मित्र मंडळ हातखंबा तर्फे गुरु पौर्णिमा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न.

हातखंबा: गेली 35 वर्ष सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा असे समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या योगायोग मित्र मंडळ हातखंबा तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे गुरु पौर्णिमा व गुणवंत विद्यार्थी सत्कार 2025 असा कार्यक्रम उत्साहात पार पडला.  हातखंबा पंचक्रोशीतील निवृत्त शिक्षक तसेच विद्यालयातील शिक्षकांना गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने मंडळाकडून सत्कार करण्यात आला. गुरुवर्य अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर तसेच श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर जुनियर कॉलेजचे दहावी व बारावी मध्ये प्रथम तीन क्रमांकात आलेल्या विद्यार्थ्यांचे मंडळातर्फे कै. अरविंद (आबा) कोळवणकर यांच्या स्मरणार्थ श्री. ओमकार कोळवणकर यांच्याकडून सन्मान चिन्ह देऊन गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरव करण्यात आला.
          सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डी.कॅड कॉलेज देवरुख चे प्राध्यापक श्री परांजपे सर हे उपस्थित होते. परांजपे सर यांनी लाईव्ह पोर्ट्रेट स्केच डेमो दाखवून आपल्या कलेने सर्वांचीच मने जिंकली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री बाबासाहेब धोंगडे, मंडळाचे मार्गदर्शक प्राध्यापक श्री.चंद्रमोहन देसाई सर, माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती.अंजली शिंदे मॅडम, उपसरपंच श्री.सुनील डांगे, निवृत्त ज्येष्ठ शिक्षक  उपस्थित होते.
              गुरु पौर्णिमा दिनानिमित सामाजिक कार्यकर्ते श्री. निरंजन जठार व योगायोग मित्र मंडळ हातखंबा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच जि.प. शाळा हातखंबा क्र.1 , हातखंबा अंगणवाडी, जि. प. शाळा तारवेवाडी, जि. प. शाळा बोंबलेवाडी मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
              संपूर्ण कार्यक्रम हा योगायोग मित्र मंडळ हातखंबाचे विद्यमान अध्यक्ष श्री.योगेश मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष संदीप गुरव, ओंकार कोळवणकर, विकास तारवे, श्रीकांत बोंबले यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आदेश डांगे यांनी केले तर सचिव श्री.सचिन सावेकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.