Friday, April 10, 2026

Latest Posts

रत्नागिरीकरांसाठी शनिवार, रविवार ‘आयपीएल फॅन पार्क‘चे आयोजन  प्रवेश विनामूल्य, मनोरंजनाचे मोफत उपक्रम

रत्नागिरी : रत्नागिरीतील क्रिकेट चाहत्यांना मैदानावरचा अनुभव देण्यासाठी ‘आयपीएल फॅन पार्क‘चे आयोजन आठवडा बाजार येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल मैदानावर करण्यात आले आहे. शनिवार (११ एप्रिल) आणि रविवार (१२ एप्रिल) रोजी होणारे सामने त्याबरोबर पाहण्यी पर्वणी येथील चाहत्यांना लाभणार असल्याची माहिती बीसीसीआचे प्रतिनिधी अनंत दातार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
या फॅन पार्कमध्ये सामने दुपारी २.३० वाजल्यापासून पाहता येणार आहेत. सामने पाहण्याचा आनंद घेत असताना मनोरंजनासाठी येथे अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये फेस पेंटिंग, चिअरिंग आणि क्रेझी स्टंट्स अशा विविध गोष्टींचा समावेश असेल. यावेळी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी बिपीन बंदरकर, दीपक देसाई आणि असोसिएशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 
यंदाच्या आयपीएल दरम्यान देशभरातील ५० शहरांमध्ये फॅन पार्क्स उभारले जात असून, त्यात रत्नागिरीचा समावेश असणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या फॅन पार्कचे मुख्य आकर्षण म्हणजे मोठ्या स्क्रीनवर, ज्यावर सामन्यातील प्रत्येक थरारक क्षण थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. यामुळे प्रेक्षकांना आपण प्रत्यक्ष स्टेडियममध्ये बसून सामना पाहत असल्याचा अनुभव घेता येणार आहे. विशेष म्हणजे, या फॅन पार्कमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून सर्व वयोगटातील चाहत्यांसाठी हे एक पर्वणीच ठरणार आहे. केवळ क्रिकेटच नव्हे, तर चाहत्यांच्या मनोरंजनासाठी येथे अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. आयपीएलच्या अधिकृत प्रायोजकांतर्फे येथे संगीत, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि शीतपेयांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. यंदा देशभरातील फॅन पार्क्समध्ये १० लाखांहून अधिक क्रिकेटप्रेमी उपस्थित राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
रत्नागिरीतील चाहत्यांना आपल्या आवडत्या संघाला आणि खेळाडूंना दाद देण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. सीमारेषेवरील चौकार-षटकार, हॅट्ट्रिक्स आणि फिरकीची जादू प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये आतापासूनच मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
जिल्हा क्रिकेट असोसिएशनने या आयोजनासाठी कंबर कसली असून, जास्तीत जास्त चाहत्यांनी आपल्या फॅन पार्कमध्ये उपस्थित राहून या क्रिकेट उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.