Sunday, February 22, 2026

Latest Posts

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीच्या शिमगोत्सवाचे पडघम; २ मार्चपासून सोहळ्याला प्रारंभ

रत्नागिरी : झाडगाव (ता. रत्नागिरी) येथील श्रीदेव भैरी मंदिर तर्फे आयोजित श्रीदेव भैरी शिमगोत्सव २०२६ हा दि. २ मार्च ते ८ मार्च २०२६ या कालावधीत पारंपरिक पद्धतीने व धार्मिक उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. उत्सवाचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि. ०२/०३/२०२६ (फाल्गुन पौर्णिमा)

रोजी रात्रौ १० वाजता झाडगाव सहाणेवरून श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ पारंपरिक पद्धतीने महालक्ष्मी शेतातून श्रीदेव भैरी मंदिरात रात्रौ ११ वाजेपर्यंत जातील. मध्यरात्री १२ वाजता श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर भेटीसाठी, ग्रामप्रदक्षिणा व जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी मंदिराबाहेर पडेल. खालची आळी, कै. बाळोबा सावंत यांच्या आगरातून महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर १.३० वाजेपर्यंत श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात आगमन होईल.

मंगळवार दि. ०३/०३/२०२६ (पहाटेचा कार्यक्रम)

पहाटे ३ वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडेल. मार्ग पुढीलप्रमाणे:

झाडगाव सहाणे – झाडगाव नाका – टिळक आळी – कॉग्रेस भूवन – मुर्लीधर मंदिर – बंदर रोड

पहाटे ५ वाजता मांडवी भडंग नाका

पुढे मांडवी – घुडेवठार – विलणकरवाडी – चंवडे वठार – खडपे वठार (समुद्रमार्गे)

शेटये यांच्या घराजवळून खडपेवठार – सकाळी १० वाजता गोडीबाव तळे

तेली आळी – राम नाका – सकाळी ११.३० वाजता राम मंदिर

दुपारी १२ वाजता राधाकृष्ण नाका – गोखले नाका

त्यानंतर गाडी तळ, घसरवाटेने मुरुवाड्यातील २० नं. शाळेमागे श्री शिवलकर यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यात येईल. दुपारी ३ वाजेपर्यंत झाडगाव सहाणेवर होळी उभी केली जाईल.

मंगळवार दि. ०३/०३/२०२६ (रात्रौ – धुळवड)

रात्रौ ९ वाजता धुळवड साजरी करण्यासाठी निशाण सहाणेवरून निघेल. मार्ग:

सांवतखोत वठार – पटवर्धन यांचे घर

देवस्थानचे मुख्य खोत श्री रमाकांत गोपाळ सांवत व श्री संतोष आत्माराम सांवत यांच्या घरी पूजा-अर्चा

श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर

सांवत खोतांची मूळ चौकी – सुर्वे बाग – शिवलकर घराजवळ – कुंभारवाडा – परटवणे फगरवठार

वरची आळी – लक्ष्मी चौक – गोखले नाका – रात्रौ ११.३० वा. ढमालनिचा पार

येथे निशाणाचे तीन भाग होतील:

पहिला भाग : गुरव मंडळींसह श्रीदेव भैरी मंदिरात.
दुसरा भाग : गोखले नाका – राधाकृष्ण नाका – मासळी बाजार – सुर्वे बोळ – मयेकर घर – झारणी रोड – राम नाका – तेली आळी – रसाळ घर.
तिसरा भाग : प-याची आळी – मारुती आळी – तेली आळी – रसाळ घर.

त्यानंतर गोडीबाव नाका – श्री देसाई यांचे घर – खडपेवठार – श्री देसाई व श्री विलणकर शेत – कै. रघू विलणकर घर – राजिवडा येथील श्रीदेव विश्वेश्वर मंदिर (सुमारे १.३० वा.). तेथे गा-हाणे होऊन पुढे राजीवड्यातील चव्हाण घराशेजारी मुस्लीम मानकरी श्री काद्री यांना श्रीफळ देऊन गळाभेट व धुळवड साजरी होईल.

त्यानंतर मार्ग: खडपेवठार सती – चंवडे वठार – विलणकरवाडी – श्री दत्त मंदिर नाका – घुडे वठार – मांडवी येथे श्री वारंग यांच्या घरी मुक्काम.

बुधवार दि. ०४/०३/२०२६

सकाळी ८ वाजता मांडवी येथून पुढील मार्गाने धुळवड:

सदानंदवाडी समुद्रमार्गे – पौडा – कुरणवाडी – सिद्धेश्वर विरेश्वर चव्हाटा (गा-हाणे)

श्री आबूलकर घर – सांब मंदिर – जोतीबा मंदिर

येथे दोन भाग होऊन:

एक भाग राम मंदिर मागील बाजूने

दुसरा भाग पुढील बाजूने मिरकरवाडा पोलिस चौकीजवळ एकत्र

त्यानंतर भैरी मंदिर – सुभेदार घर – पिलणकर फिशरीज फॅक्टरी – विठलादेवी – श्री शिरधनकर घर – मुरुगवाडा घसरवाट.

तेथे दोन भाग:

झाडगावकर कंपाऊंड

पंधरा माड येथील श्री पिलणकर घर

दुपारी १२ वाजता सांवतखोत यांच्या मूळ चौकीवर धुळवडीची सांगता.

दि. ०४ ते ०७ मार्च २०२६

दुपारी १२ वाजेपर्यंत पालखी झाडगाव सहाणेवर दर्शनासाठी स्थानापन्न

दररोज रात्री १० ते १२ वाजेपर्यंत प्रत्येक वाडी तर्फे पारंपरिक पालखी नाचविणे

शनिवार दि. ०७/०३/२०२६

दुपारी १२ वाजता पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी: झाडगाव – श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर – खालची आळी – भैरी मंदिर मार्गे – पाटील कंपनी मागील बाजू – मुरुगवाडा – पंधरा माड – रात्रौ १० वा. सहाणेवर आगमन. त्यानंतर पालखी नाचविणे.

रविवार दि. ०८/०३/२०२६ (फाल्गुन पंचमी – रंगपंचमी)

दुपारी १ वाजता पालखी सहाणेवरून रंग खेळण्यासाठी निघेल. पोलिस कर्मचाऱ्यांची शस्त्र सलामी घेत पुढील मार्गाने:

वरचा खोत वठार – श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर – खेडसकर सांवत कंपाऊंड

झाडगाव नाका – खालचा खोत वठार – दुपारी ३ वा. झाडगाव नाका

सायं. ४ वा. गाडी तळ – ५ वा. श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिर

शहर पोलीस स्टेशन – धनजी नाका – सायं. ६.३० वा. राधाकृष्ण नाका

७ वा. राम नाका – राम मंदिर – मारुती आळी – गोखले नाका

रात्रौ ९ वा. ढमालनिचा पार

विठ्ठल मंदिर – हॉटेल प्रभा – कॉग्रेस भूवन – मुरलीधर मंदिर

रात्रौ ११.३० वा. श्रीदेव भैरी मंदिर प्रांगणात आगमन

रात्रौ १२ वाजता पालखी मंदिरात स्थानापन्न होईल. धुपारती व गावाचे गा-हाणे होऊन शिमगा उत्सवाची सांगता होईल.– अध्यक्ष, भैरी देवस्थान, झाडगाव, रत्नागिरी

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.