Sunday, March 16, 2025

Latest Posts

रत्नागिरीतील  उंच इमारतींमधील अग्निशामन यंत्रांचे तपासणीची मागणी  सुदेश मयेकर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी :  मागील काही वर्षात रत्नागिरी शहरामध्ये सात मजल्यापासून 11 ते 14 मजली उंच इमारती उभ्या रहात आहेत. या इमारतींमध्ये बसवलेल्या अग्नीशमन यंत्रणा सुरु आहेत का याचे प्रात्यक्षिक नगर पालिकेने घेतले आहे का असा प्रश्न माजी उपनगराध्यक्ष सुदेश मयेकर यांनी उपस्थित केला आहे. या यंत्रणांची तपासणी करावी अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षित अग्नीशमन कर्मचार्‍यांचा प्रस्ताव तयार करुन शासनाला पाठवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
रत्नागिरी शहराचा विकास होत असतानाच नगर पालिका हद्दीत मोठ्याप्रमाणात उंच इमारती उभ्या रहात आहेत. सर्र्‍हास सात मजली इमारती उभारण्यात येत असून आता 11 ते 14 मजली इमारतींची बांधकामे सुरु आहेत. या इमारती उभ्या करताना  अग्नीशमन यंत्रणाही यात बसविली जाते. परंतु या यंत्रणेची चाचपणी केली जाते का असा प्रश्न माजी उपनगराध्यक्ष व शिवसेना नेते सुदेश मयेकर यांनी उपस्थित केला आहे. या इमारतींना पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यापूर्वी या यंत्रणांची चाचणी करुन घेण्यात येते का अशी विचारणा त्यांनी मुख्याधिकार्‍यांकडे केली आहे. त्यातच रत्नागिरीत असणार्‍या इग्नीशमन दलाच्या गाड्यांच्या शिड्याही एवढ्या लांब नसल्याने इमारतींमधील यंत्रणा सुसज्ज ठेवणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी शहरातील राधाकृष्ण नाका ते झारणी रोडपयर्र्त असणार्‍या दुतर्फा दुकानांमुळे मोठी अग्नीशमन गाडी आत जाणे कठीण बनले आहे. तशीच स्थिती मिरकरवाडा आणि राजिवडा परिसरात आहे. अग्नीशमन यंत्रणा अरुंद रस्त्यांमुळे दुर्घटना स्थळी पोहचू शकत नाही. रनपकडे प्रशिक्षित कर्मचारीही कमी असल्याने नगर पालिकेने त्याबाबत प्रस्ताव तयार केला आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे नगर पालिकेने तातडीने प्रशिक्षित कर्मचार्‍यांचा प्रस्ताव तयार करुन शासनाला पाठवावा आणि उंच इमारतींमधील अग्नीशमन यंत्रणांचीही तपासणी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.