Tuesday, March 24, 2026

Latest Posts

रत्नागिरीतील जहाजाची प्रतिकृती कोलकाता संग्रहालयात

रत्नागिरी : शहरापासून जवळच असलेल्या मिरजोळे पाटीलवाडी येथे दी माॅडेल क्राफ्टच्या टीमने अवघ्या २२ दिवसांत तयार केलेल्या ३५ फूट आकाराच्या ‘आयएनएस ओल्ड विक्रांत’ जहाजाची प्रतिकृती दिल्ली रक्षा मंत्रालयाच्या कोलकाता येथील पी. एम. संग्रहालयाचे आकर्षण ठरणार आहे. टीम लीडर मयूर वाडेकर व त्याच्या १४ जणांच्या टीमने ही जहाजाची भव्य प्रतिकृती तयार केली आहे. रत्नागिरीत तयार झालेली ही भारतातील पहिली प्रतिकृती असल्याचे मयूर याने सांगितले.
मयूर हा २०१३ सालचा नेव्हल एनसीसी छात्र असून, त्याने सन २०१९ ते २०२१ या कालावधीत शीप माॅडेलिंगचे प्रशिक्षण कोचिन येथे पूर्ण केले. त्यानंतर २०१७ पासून तो शीप माॅडेलिंग करत आहे. मयूर याच्या दी माॅडेल क्राफ्ट टीमला ‘आयएनएस ओल्ड विक्रांत’ जहाजाची प्रतिकृती अवघ्या एक महिन्यात तयार करण्याची ऑर्डर मिळाली. वूड प्लस जीआरपीमध्ये ही प्रतिकृती तयार करायची असल्याने टीमपुढे आव्हान होते. मात्र गेले २२ दिवस-रात्र अखंड परिश्रम घेत मयूर वाडेकर व त्याच्या टीमला ३५ फूट आकार व तीन टनापेक्षा जास्त वजनाच्या जहाजाची प्रतिकृती तयार करण्यात यश आले आहे. जहाजाची प्रतिकृती तयार करण्यासाठी दीड लाखापेक्षा अधिक खर्च आला आहे. वूड फिनिशिंग, सॅंडिंग, पार्ट फिनिशिंग, स्टील वेल्डिंग, एअरक्राफ्ट तयार करण्यासाठी वेळ अधिक लागतो. वैशिष्ट्य म्हणजे कलाकाैशल्याचा वापर करून जहाजाची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे ‘शिवधनुष्य’ पेलण्यासारखे आहे. मात्र मयूर व त्याची टीम त्यामध्ये यशस्वी ठरली आहे.
……..
मयूर याने यापूर्वी ‘आएनएस कुकरी’ ही प्रतिकृती जुवे येथे उभारली होती. त्यानंतर ‘आएनएस विक्रांत’, ‘आयएनएस विशाखापट्टणम्’, ‘आएनएस कोची’, ‘आएनएस कोलकत्ता’ या जहाजांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. मात्र त्यांचा आकार १५ ते २५ फूट होता. ३५ फुटी ‘आयएनएस ओल्ड विक्रांत’ची प्रतिकृती तयार करण्याचा त्याचा पहिलाच प्रयत्न होता व तो यशस्वी झाला आहे.

………..
शीप माॅडेलिंगमध्ये करिअर करता येते. परंतु, त्यासाठी योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे. प्रयत्न, कष्ट, चिकाटीतून यश मिळवता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेचे नियोजन गरजेचे आहे. गोवा, कोचिन शिपयार्डकडून विविध प्रकारच्या ऑर्डर तयार करण्याचे प्रोजेक्ट उपलब्ध होतात. कमी अवधीत भव्य प्रतिकृती तयार करण्यात सर्व टीमचे सहकार्य मोलाचे ठरले.

– मयूर वाडेकर
…….

सहभागी टीम
मयूर याच्या दी माॅडेल क्राॅफ्टमध्ये ‘आयएनएस ओल्ड विक्रांत’ची प्रतिकृती तयार करण्यासाठी नीलेश मेस्त्री, महेंद्र कोलगे, दीपक मेस्त्री, दानियाल सारंग, निहारिका राऊत, फहद लाला, अर्श फणसोपकर, निखिल गावकर, संपदा हर्डीकर यांचा समावेश होता

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.