Wednesday, July 30, 2025

Latest Posts

रत्नागिरीत पुन्हा एकदा अवतरणार ‘महानमन’ -कोकण नमन कलामंच, रत्नागिरी तालुका शाखेची निर्मिती

गावागावात संस्थेतर्फे होतेय जनजागृती, 29 मार्च आणि 2 एप्रिल रोजी होणार सादारीकरण 

रत्नागिरी : रत्नागिरी आणि परिसरातील कलाकारांना भव्य व्यासपीठ मिळवून देण्याया हेतूने येथील नमन मंडळातील कलावंताचा एकत्रित सहभाग असलेले महानमन लवकरच रसिकांपुढे आणले जाणार आहे. कोकण नमन कलामंचतर्फे निर्मिती करण्यात आलेल्या या महानमनाचे निमंत्रण आता तालुक्यातील गावोगावी पोहचून न नमन कलामंच तर्फे जागर केला जात आहे.
   कोकण ही भूमीच कलेची, कलाकारांची आहे. या लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनपर भाष्य, काल्पनिक, पौराणिक, ऐतिहासिक कथांच्या आधारे एक चित्तथरारक वगनाटय़ सादर करीत नमनाचा सांगावा केला जातो. त्यातूनच रंगभूमीची सेवा केली जाते. यातूनच हा या महानमन निर्मितीतून कलाकार व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयास आहे. नमन या लोककली सातासमुद्रापार महती पोहाली आहे. यातूनच आता या महानमनी निर्मिती करण्यात आली आहे. हे महानमन सादरीकरणासाठी कोकण नमन कलामां रत्नागिरी तालुका शाखा यांयातर्फे जोरदार मेहनत घेण्यात आली आहे. येत्या 29 मार्च रोजी तालुक्यातील जाकादेवी येथे तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय व 2 एप्रिल रोजी डी.जे.सामंत महाविद्यालय पाली येथे या महानमनचे सादरीकरण होणार आहे. 
    रत्नागिरी येथे गतवर्षी भरवलेल्या नमन महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अनेक स्थानिक कलाकारांना एक व्यासपीठही मिळाले होते. कोकण नमन कलामंचचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ पी. टी. कांबळे, उपाध्यक्ष अरुण कळंबटे, संस्थापक अध्यक्ष श्रीधर खापरे, सुरेश होरंबे, यांयासह संस्था पदाधिकारी आणि सदस्य, जंबो कार्यकारणी सदस्य व कलावंत यांच्या उपस्थित महानमनाचा देखील आरंभ झाला होता. आता यावर्षी देखील महानमन निर्मिती करण्यात आली आहे. 80 नामवंत कलाकारांसहृ फिरत्या रंगमांवर नयनरम्य देखाव्यांसहृ गणेश आराधना, स्त्री पात्रांनी नटलेली नटखट गौळण, छ.शिवाजी महाराजां ज्वलंत इतिहास डोळय़ासमोर आणणारे ऐतहासिक वगनाटय़ असे हे सादरीकरण केले जाणार आहे. या कलाकृतीसाठी सर्व पदाधिकारी, सदस्य मेहनत घेत आहेत. त्यासाठी येथील गावागावातून नमन मंडळे, तेथील मानकरी, गावकरी, मान्यवर यांच्या प्रत्यक्ष भेटी घेत कोकण नमन कलामंच, रत्नागिरी तालुका शाखेमार्फत या महानमनाची जोरदार जनजागृती केली जात आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.