Tuesday, March 24, 2026

Latest Posts

रत्नागिरीत VLF इंटरनॅशनल ब्रँडची ‘Mobster-135’ दमदार पेट्रोल बाइक लॉन्च

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या VLF या ब्रँडची बहुप्रतिक्षित ‘Mobster-135’ ही दमदार पेट्रोल बाइक आज शनिवारी टीआरपी येथील सुरेख मोटर्सच्या दालनात आयोजित सोहळ्यात लॉन्च करण्यात आली. या बाइकचे उद्घाटन CIPD चे राष्ट्रीय अध्यक्ष व हॉटेल कार्निव्हलचे संचालक उदय लोध, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक सागर नाईक, सीपीसी प्रमुख श्री. कुंभार सर,शाखा व्यवस्थापक नबास देवधर, चिपळूण अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक समीर ठाकूर, मैत्री ग्रुपचे कौस्तुभ सावंत व सुहास ठाकूरदेसाई व सावंत परिवाराच्या उपस्थितीत करण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली VLF Mobster-135 ही बाइक खरेदी करण्याचा मान साळवी कुटुंबाला मिळाला. या वेळी बोलताना मान्यवरांनी VLF ब्रँडच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे आणि तरुणाईला आकर्षित करणाऱ्या डिझाइनचे विशेष कौतुक केले. Mobster-135 या बाइकमध्ये आकर्षक व स्टायलिश लूक, आधुनिक डिजिटल डिस्प्ले, सुरक्षिततेसाठी ABS, ड्युअल ट्रॅक्शन कंट्रोल, आरामदायी गॅस फिल्ड सस्पेन्शन तसेच मजबूत ड्युअल डिस्क ब्रेक यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

कार्यक्रमाचे आयोजक Surekh Motors हे गेल्या सहा वर्षांपासून इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून, आता MOTOHAUS या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी पेट्रोल टू-व्हीलर क्षेत्रात दमदार प्रवेश केला आहे. यामुळे रत्नागिरीतील दुचाकीप्रेमींना आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवा पर्याय उपलब्ध झाला असून, युवक वर्गात या बाइकबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
पत्ता-मोटोहाउस,अंबर हॉल शेजारी,टी आर पी,रत्नागिरी
९६३७७६९३९६/९१७५१११८८८

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.