रत्नागिरी : रत्नागिरी तालुका शालेय फ्रीस्टाईल व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धा सोमवार, दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा विक्रमी प्रतिसाद लाभला असून तब्बल 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.दिवसभर कुस्तीच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. खेळाडूवृत्ती, शिस्तबद्ध आयोजन व ग्रामीण भागातील शाळांचा विशेष सहभाग या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.
उद्घाटन सोहळा भव्यतेनेस्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. गजानन (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
या वेळी फणसोप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व क्रीडापटू सौ. नेत्राताई राजेशिर्के, बसणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. नाईक सर, तालुका क्रीडा समन्वयक श्री. विनोद मेयेकर, स्पर्धा प्रमुख श्री. तुफिल पटेल, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक व असंख्य पालक उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. गजानन (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
या वेळी फणसोप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व क्रीडापटू सौ. नेत्राताई राजेशिर्के, बसणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. नाईक सर, तालुका क्रीडा समन्वयक श्री. विनोद मेयेकर, स्पर्धा प्रमुख श्री. तुफिल पटेल, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक व असंख्य पालक उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख श्री. तुफिल पटेल यांनी केले. तर आभारप्रदर्शन सौ. नेत्राताई राजेशिर्के यांनी मानले.
स्पर्धा संचालनात विविधांचा सहभाग
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी अनेक क्रीडाशिक्षक व स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.
पंच म्हणून उमरे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक श्री. गलांडे सर, कुरतडे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक श्री. कदम सर तसेच पालीचे सुपुत्र श्री. भावेश सावंत यांनी काम पाहिले.
गुणलेखन व सामन्यांचे आयोजन प्रसिद्ध कुस्तीपटू स्वप्निल घडशी यांनी केले.
वेळाधिकारी म्हणून ऋषिकेश साळुंखे यांनी जबाबदारी पार पाडली.
निकालपत्रक तयार करण्याचे काम शिवाजी हायस्कूलचे शिक्षक श्री. सैफुद्दीन पठाण यांनी केले.
उभरते कुस्तीपटू घडविणारे व्यासपीठ
या स्पर्धांमधून अनेक उभरते कुस्तीपटू पुढे येत असून त्यांना पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडाविकासासाठी व कुस्ती या पारंपरिक खेळाला चालना मिळण्यासाठी या स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



