रत्नागिरी:- दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये एतिहासिक १५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार करून उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत शुक्रवारी सकाळी रत्नागिरीत दाखल झाले. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे रत्नागिरी विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात ना. सामंत यांचे रत्नागिरीत जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी गाड्यांचा मोठाच्या मोठा ताफा सज्ज ठेवण्यात आला होता.