रत्नागिरी : गेले दोन ते तीन दिवस हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्याला यल्लो अलर्ट दिला असून रत्नागिरी शहरात गुरुवारी पहाटे तीन वाजण्याचा सुमारास पावसाची दमदार बॅटिंग सुरू झाली. त्यामुळे रत्नागिरीतील बळीराजा आता चिंतेत आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार मोठा चिंतेत पडला आहे. गुरुवारी पहाटे विजांचा कडकडाटासह पावसाने जोरदार सुरुवात केली होती. राजापूर तालुक्यातील आडीवरे या गावात सुद्धा पावसाने गुरुवारी रात्रीपासून दमदार हजेरी. रत्नागिरी शहरात पडणाऱ्या पावसामुळे विद्युत वाहिनी सुद्धा खंडित करण्यात आली होती.