रत्नागिरी: पोलीस स्थानकात तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याचबरोबर रत्नागिरी शहर गुन्हेगारी मुक्त करण्याचा आपला ध्यास असल्याचे रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे नूतन पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी बुधवारी शहर पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी ते सागरी सुरक्षा येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सामाजिक सलोखा, आदर्श जातीय सलोखा निर्माण करून रत्नागिरीचा एक आदर्श उभा करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी शहरात सध्या अमली पदार्थांचे सेवन आणि विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे. शहर अमली पदार्थमुक्त करत गुर्दुल्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. नागरिकांसोबत काम करून फ्रेंडली पोलीस, लोकाभिमुख पोलीस प्रशासन तयार करून नागरिकांना पोलीस शत्रू नसून मित्र वाटावा असे काम करणार असल्याचेही पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले