Wednesday, March 25, 2026

Latest Posts

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे काम आपण सर्वांनी पुढे घेऊन जाऊयात- प्रमोद कोनकर

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र स्थापन होऊन चार वर्षे झाली. या चार वर्षांच्या कालावधीत उपकेंद्राकडून संस्कृत व संस्कृतीनिष्ठ कार्यक्रमांचे आयोजन रत्नागिरीकरांसाठी करण्यात आले आहे. सध्या भारतीय संस्कृती आणि संस्कृत भाषेविषयी जनमानसात कुतुहूल निर्माण होत आहे. त्यामुळे योग्य वेळी हे उपकेंद्र रत्नागिरीत कार्यरत झालेले आहे. त्यामुळे यापुढे उपकेंद्राचे काम आपण सर्वांनी संघटितपणे पुढे घेऊन जाऊया, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांनी केले. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात उपकेंद्राच्या चतुर्थ स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली आणि यानंतर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या ४ वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेणारी चित्रफित दाखवण्यात आली. प्रमोद कोनकर पुढे म्हणाले की, संस्कृत भाषेच्या माध्यमातून आपण संस्कृती आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच आचरणात आणतो तर अशावेळी आपण संस्कृत भाषेसोबतच संस्कृती जोपासणे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्याकडील ज्ञान हे समाजापर्यंत नेणे गरजेचे आहे. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राद्वारे राबवले जाणारे कार्यक्रम आणि उपक्रम इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे त्यामुळे उपकेंद्राची महती प्रत्येकापर्यंत पोहोचेल.

उपकेंद्रातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शशांक पाटील म्हणाले की, उपकेंद्रात जेव्हापासून नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला आहे, तेव्हापासून रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राद्वारे आयोजित जाणाऱ्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारप्रक्रियेला चालना मिळते.

रत्नागिरी उपकेंद्राला स्थापन होऊन चार वर्षे झाल्याबद्दल उपकेंद्रातील कर्मचारी प्रथमेश घोसाळे, करण कीर, अपर्णा कोकरे, साक्षी भाटकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शिवाय कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झालेल्या मानसी यमगर, पूर्वा पावसकर, महादेव काळे, अपूर्वा मुसळे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच उपकेंद्राला नेहमीच सहकार्य करणारे पत्रकार- छायाचित्रकार मकरंद पटवर्धन यांचा देखील सत्कार डॉ. दिनकर मराठे यांनी केला.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.