रत्नागिरी : आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून धनंजय मराठे (कातळ शिल्प संशोधक) यांच्या मागणीनुसार तसेच अनिकेत पटवर्धन यांच्या सहकार्याने वारसा संवर्धनाच्या जनजागृती साठी दुर्मिळ वारसा असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील अश्मयुगीन कातळशिल्प रेखांकित टीशर्ट चे अनावरण भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कातळशिल्प वारसा संशोधन केंद्र डॉ.बा.ना.सावंत रोड रत्नागिरी येथे 12:30 वाजता संपन्न झाले. यावेळी तेथील पदाधिकारी यांनी भाजपा पदाधिकारी यांना कातळशिल्पाचे महत्त्व पटवून दिले, संशोधन, पर्यटन, शेती या विषयासाठी कातळशिल्प संशोधन केंद्राचे महत्व काय आहे हे सांगत आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या टी-शर्टमुळे या संशोधन केंद्रास प्रसिद्धी मिळणार आहे असे सांगितले. यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, प्रदेश सचिव शिल्पा मराठे , युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन, तालुका अध्यक्ष दक्षिण दादा दळी, तालुका अध्यक्ष उत्तर विवेक सुर्वे शहर अध्यक्ष राजेंद्र फाळके, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संकेत कदम, मनोर दळी, भक्ती दळी, निलेश आखाडे, उमेश देसाई आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
