रत्नागिरी : शहरातील रहाटाघर येथील आत्मबंधु इमारतीमधील रहिवासी चेतन दिलीप मयेकर (४४) यांचे २० जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. चेतन मयेकर हे कस्टम विभागांतर्गत श्रीराम लॉजिस्टीक कंपनीमध्ये गेली अनेक वर्षे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. मयेकर हे प्रेमळ, मनमिळावू आणि परोपकारी वृत्तीचे होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने नातेवाईकांसह संपूर्ण मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. मयेकर यांच्यावर शहरातील मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.