रत्नागिरी : राजापूर येथील १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱया वृद्धाला न्यायालयाने जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी वासुदेव अर्जुन गुरव (७७, ऱा राजापूर) असे आरोपीचे नाव आह़े पिडीत मुलीशी जबरदस्तीने शरिरसंबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी वासुदेव गुरव याच्याविरुद्ध राजापूर पोलिसांनी अटक करुन गुन्हा दाखल केला होता. तसेच सत्र न्यालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होते
विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी अभियोक्ता अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिल़े खटल्यातील माहितीनुसार पिडीता ही १२ वर्षाची असून ७ ऑक्टोबर २०२२ रोजी आरोपी याने पिडतेच्या घरामध्ये प्रवेश केल़ा घरात कोणही नसल्याचा फायदा उठवत आरोपी याने तिच्याशी जबरदस्तीने शरिरसंबंध प्रस्थापित केल़े तसेच घडला प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिल़ी यानंतर 16 ऑक्टोबर २०२२ रोजी आरोपी याने पुन्हा पिडितेच्या घरी येवून तिच्याशी जबरदस्तीने शरिरसंबंध प्रस्थापित केल़े असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होत़ा
दरम्यान पिडिता ही गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आल़ा 30 जानेवारी २०२३ रोजी पिडितेने आरोपिविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात तक्रारदार केल़ी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, ५०६ व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८ नुसार गुन्हा दाखल केला तसेच आरोपी वासुदेव गुरव याला अटक करण्यात आल़ी गुह्याचा तपास राजापूर पोलीस ठाण्यातील तात्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक मधुकर मौले यांनी केल़ा खटल्यादरम्यान एकूण १७ साक्षिदार सरकार पक्षाकडून तपासण्यात आल़े न्यायालयापुढे पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल विकास खांदारे यांनी काम पाहिल़े
