Wednesday, March 25, 2026

Latest Posts

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांच्या नावाची प्रभाग क्रमांक ४ चार मध्ये जोरदार चर्चा.

रत्नागिरी:   प्रभाग क्रमांक ४ चार हा *कोकण नगर* , *किर्ती नगर* , *क्रांतीनगर* , *स्टेट बँक कॉलनी* *नगरपरिषद कर्मचारी वसाहत*, *चरमले* हा भाग येतो. या भागामध्ये *राष्ट्रवादी काँग्रेसचे* माझी नगरसेवक *मुसा काजी* यांनी पक्षाशी गद्दारी करून शिवसेना मध्ये  पक्षांतर केल्यानंतर *आता ते बीजेपी बरोबर युती* असणाऱ्या *शिवसेना शिंदे* पक्षात सक्रिय आहेत. या भागामध्ये *राष्ट्रवादी काँग्रेसची* धुरा सांभाळून जवळजवळ मागील पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावांत, प्रामाणिक *युवक जिल्हाध्यक्ष* *नौसीन काझी* हे सक्रिय आहेत.
           *नौसीन काझी* हे त्यांच्या *कोकण नगर* येथील *जनसंपर्क कार्यालयामार्फत* जनतेच्या जनहिताची कामे सातत्याने करत आहेत त्यामध्ये भागातील समस्यांबाबत विशेषता *लाईट* , *पाणी* , *गटार* , *रस्ते* याबाबत वारंवार *नगरपालिकेत जाऊन* संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून आवाज उठवताना ते दिसून येतात.  तसेच *सेतू* मधील जनतेची त्यामध्ये विशेष करून *राशन कार्ड* , *आधार कार्ड,*  इत्यादी कामे, व *वैद्यकीय* , *शासकीय योजनेची*  कामे ते नागरिकांसाठी करत असतात.
          प्रामुख्याने *इलेक्शन कार्ड* *नवीन* बनवणे, *नावामध्ये दुरुस्ती* करणे , *पत्ता बदल* , या संदर्भात या प्रभागातील लोकांची अडीअडचणीची कामे निशुल्कपणे करत आहेत. आणि याचेच परिणाम होऊन गेलेल्या *लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीच्या उमेदवारासाठी* *नौसीन काझी* यांनी महत्वाची भूमिका बजावली होती आणि *प्रभाग क्रमांक ४ चार* मधून *बहुमूल्य लीड* घेऊन देण्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा होता.
           या सर्व बाबींना लक्षात घेता केलेल्या व करत असलेल्या कामांवरून *नौसीन काझी* यांचा या प्रभागामध्ये  वैयक्तिक स्थानिकांमध्ये दांडगा संपर्क आहे असे दिसून येते आणि हीच त्यांची मोठी जमेची बाजू आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला ही *निवडणूक कठीण जाणार* हे स्पष्ट होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.